www.24taas.com, मुंबई
मनपा निवडणुकांनंतर मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीची कु-हाड कोसळ्याची शक्यता, वीज दरवाढीसह किमान बसभाडे पाच रुपये करण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मुंबईकरांवर आता बेस्ट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर आठवडा उलटण्याच्या आत बेस्ट बसच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार झाल्याचं सांगण्यात येतंय. बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. आज होणा-या बेस्ट समितीच्या सभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येईल. ३१९ कोटी रुपयांचा तोटा भरुन काढण्यासाठी बेस्ट बसभाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.
साधी आणि लिमिटेड बसचे किमान भाडे पाच रुपये, नेत्रहिनांचे भाडे एक रुपयांवरुन तीन रुपये, साध्या बसचे पुढल्या टप्प्याचे भाडे ७, १०, १२ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. एसी बसचे पहिले दोन किमीसाठी पाच रुपयांचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे फ्लायओव्हरवरुन जाणा-या एक्सप्रेस बसचे किमान भाडे सहा रुपये तर पुढील टप्प्यात ९, १२, १५ आणि १८ रुपये भाडे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. तर वीज दरवाढाचाही प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.