मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखांकडे नगरसेवक आणि इच्छुक उमेदवाराच लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडी जत्रेच्या तारखेकडे निवडणुकीतील तमाम इच्छुकांच लक्ष लागलंय. पालिका निवडणुका आणि आंगणेवाडी जत्रा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात जाहीर झाली तर मतदानावर मोठा परिणाम होण्याची भिती इच्छुक उमेदवारांनी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या काळात मतदारांनी मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने बारावीच्या परीक्षांपूर्वी पालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र पालिका निवडणुका आणि आंगणेवाडी जत्रा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात जाहीर झाली तर मतदानावर मोठा परिणाम होण्याची भीती इच्छुक उमेदवारानी केली आहे. याच आंगणेवाडी भराडीदेवीच्या यात्रेच्या काळात रत्नागिरीतल्या बाबर शेख उरूसला मुंबईकर जातात.त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांसमोर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी पहिल्यांदा निवडणुकनंतरच आंगणेवाडी जत्रा असा निर्णय शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला आहे. मागची आंगणेवाडी जत्रा १० फेब्रुवारीला होती आणि पालिका २००७ ची निवडणूक १ फेब्रुवारीला मतदान तर दोन तारखेला निकाल जाहीर झाला होता. त्यामुळे जत्रेचा नवस फेडण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी उत्साहात जत्रा साजरी केली होती. त्यामुळे यंदाही निवडणुकीनंतरच आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित होईल असा विश्वास इच्छुक उमेदवारांनी केला आहे.