मुंबईतील बलात्काराचा प्रयत्न अखेर बनावच

मुंबईतील गोरेगाव इथे महिलेचे अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न बनाव असल्याचं उघड झालं आहे. या महिलेने आपल्या एका पुरुष साथीदारासह हा बनाव रचला होता.

Updated: Mar 1, 2012, 11:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील गोरेगाव इथे महिलेचे अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न बनाव असल्याचं उघड झालं आहे. या महिलेने आपल्या एका पुरुष साथीदारासह हा बनाव रचला होता.

 

पोलिसांनी या पुरुष साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे समोर आलं आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती.

 

मुंबईतल्या गोरेगावात एका गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. गोरेगावातल्या वनराई परिसरात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे. पीडित महिलेचं अज्ञात लोकांनी कारमधून अपहरण केलं. त्यानंतर तिला काही अंतरावर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शिवाय तिच्याजवळचा मौल्यवान ऐवजही लुटण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

मुंबईत दिवसाढवळ्या गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.