मुंबईत बस उलटून १ ठार, १६ गंभीर

मुंबईतील बांद्रा येथील कलानगर येथे डबलडेकर बस उलटल्याने एकाचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात 3५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे भीती व्यक्त होत आहे. हा अपघात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

Updated: Apr 6, 2012, 11:02 PM IST


www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईतील बांद्रा येथील कलानगर येथे डबलडेकर बस उलटल्याने एकाचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ३० प्रवाशी जखमी झाल्याचे भीती व्यक्त होत आहे. हा अपघात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

 

 

३१० क्रमांकाची डबलडेकर बस कलानगर येथे आली असता पलटी झाली. यावेळी बसखाली एक मोटारसायकल सापडली. मोटारसायकलचा चुरा झाला आहे. यात बाईक स्वाराचा मृत्यू झाला. बस भरधाव वेगाने चालली असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस कलंडली. कलानगर आगाराची बस कुर्ल्यावरून येत होती. या बस अपघातात ३० प्रवाशी जखमी झालेल. त्यातील १६ प्रवासी गंभीर आहेत. जखमींवर भाभा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे. बसमध्ये ४० ते ५० प्रवाशी होते.

 

 

अपघातानंतर बस क्रेनच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूला करण्यात आली आहे. दरम्यान, बस चालक जालिंदर भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.  जखमींना वांद्रे इथल्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बसमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी बसच्या मागील काचा तोडण्यात आल्या. प्रवाशांच्या मदतीला लोक धावल्याने जखमींवर वेळेत उपचार करण्यात आलेत.

 

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="78567"]