रणसंग्राम २०१२चे नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन

राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याची बित्तम बातमी पाहण्यासाठी झी 24 तासनं खास नवी वेबसाईट सुरू केली आहे. रणसंग्राम २०१२ या नव्या वेबसाईटचं उदघाटन नुकताच उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं.

Updated: Jan 30, 2012, 05:33 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्या पक्षाचं धोरण काय असणार? उमेदवारी कुणाला मिळणार, कुणाचे पत्ते कट होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. याची बित्तम बातमी पाहण्यासाठी झी 24 तासनं खास नवी वेबसाईट सुरू केली आहे. रणसंग्राम २०१२ या नव्या वेबसाईटचं उदघाटन नुकताच उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं.

 

www.24taas.com  या झी २४ तासच्या नव्या वेबसाईटवर रणसंग्राम २०१२ ही मायक्रो वेबसाईट तयार  आली आहे. http://zeenews.india.com/marathi/ransangram या लिंकवर क्लिक केल्यास आपण पाहू शकाल निवडणुकीची प्रत्येक खबर. या वेबसाईटवर पाहता येईल. मुंबई, ठाणे, पुण्यासह १० मनपा , २७ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकांची क्षणाक्षणाची बातमी.

 

तुम्हांला झी २४ तासच्या या वेबसाईटवर पाहता येईल रणसंग्राम २०१२ मध्ये असणार आहे निवडणुकीची प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, मागील वर्षाचं पक्षीय बलाबल, निवडणुकी कार्यक्रम काय असणार याची संपूर्ण माहिती आपल्याला रणसंग्राम २०१२ मध्ये, मुंबई – ठाणे, पुणे – नाशिकसह प्रत्येक महानगरपालिकेची क्षणाक्षणाची खबरबात आपल्याला जाणून घेता येईल.

 

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मतदानाचे संपूर्ण निकाल देखील पाहता येतील फक्त रणसंग्राम २०१२ मध्ये. तसचं निवडणुकींचे काही निवडण क्षण आपणाला फोटो फिचरच्या माध्यमातून पाहता येईल. तसचं निवडणुकींचा ह्या रणसंग्रामाची खास क्षणचित्र व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. तसचं खास आपल्यासाठी आपलं असं स्वत:चं मत देखील या वेबसाईटवर माडंता येणार आहे. तर रणसंग्राम २०१२ ला नक्की भेट द्या.

 

[jwplayer mediaid="37947"]

 

[jwplayer mediaid="37962"]