राज ठाकरेंवर पुन्हा याचिका दाखल होणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आता आणखी एक याचिका कोर्टात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

Updated: Aug 6, 2012, 10:08 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आता आणखी एक याचिका कोर्टात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नवी याचिका दाखल झाल्यास राज ठाकरे त्याबाबत कसा पवित्रा घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

मुंबई हायकोर्टात दाखल झालेली याचिका न्या . गवई यांच्याकडे सुनावणीसाठी आली होती .मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी मनसेला शिवाजीपार्क मैदानावर जाहीर सभा घेण्याची परवानगी कोर्टानेनाकारल्यानंतर राज ठाकरे यांनी कोर्टाच्या विरोधात प्रसिद्धीमाध्यमांकडे नाराजी व्यक्त केली होती . या मुद्यावरून राजठाकरे यांच्या विरोधात अॅड . सय्यद एजाज नक्वी अवमान याचिका दाखल केली आहे .

 

ही याचिका न्या . गवईयांच्याकडे सुनावणीसाठी आली होती . पण , ही फौजदारी स्वरुपाची अवमान याचिका असल्याने ती न्या . शरदबोबडे व न्या . मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्याच्या सूचना न्या . गवई यांनी दिल्या .त्यासाठी नव्याने अर्ज करण्याचे त्यांनी आदेशात नमूद केले . त्यानुसार येत्या सोमवारी अर्जदारांतर्फे नव्याने अर्जदाखल होण्याची शक्यता आहे .