रामदास आठवले शिवसेनेवर नाराज

राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळं रामदास आठवले शिवसेनेवर नाराज झालेत. त्यामुळं आता महायुतीकडून मिळालेली सर्व पदं परत करण्याचा निर्णय आरपीआयनं घेतला आहे.

Updated: Mar 17, 2012, 06:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळं रामदास आठवले शिवसेनेवर नाराज झालेत. त्यामुळं आता महायुतीकडून मिळालेली सर्व पदं परत करण्याचा निर्णय आरपीआयनं घेतला आहे.

 

 

आरपीआयच्या या भूमिकेमुळं महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आता शिवसेना नेते यावर काय भूमिका घेतात याकडं सगळयांचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकीत आरपीआयला कमी जागा दिल्याने आठवले नाराज होते. मात्र, काहीतरी तोडगा काढून जास्त पडणाऱ्या जागा दिल्याने धुसफूस होती. आता यात अधिक भर पडला आहे.

 

 

राष्ट्रवादीने दगाफटका दिल्याने रामदास आठवले यांनी सेनेशी घरोबा केला. परंतु आता राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आठवले नाराज झाले आहेत. त्यामुळे महायुतीत दरार निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. आठवले यांची नाराजी शिवसेना कशी दूर करते, यावरूच पुढेचे महायुतीचे गणित दिसून येणार आहे.

 

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="67133"]