रेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यता

महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.

Updated: Mar 3, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.

 

 

आधीच महागाईमुळं सर्वसामान्य होरपळलेले असताना, यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये भाडेवाढीचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना, त्यांनी रेल्वेच्या काही विभागांमध्ये खाजगीकरणाच्या पर्यायाचाही विचार सुरु असल्याचं सांगीतलय. मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांबाबत चिंता व्यक्त करताना, हे थांबवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय. सुरक्षा, विकास आणि आधुनिकीकरण हे मुख्य उद्देश असल्याचं सांगतानाच त्यांनी खाजगीकरणालाही होकार असल्याचं म्हटल आहे.

 

प्रमुख मागण्या

केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यावेळी पहिल्यादांच रेल्वेबजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या समस्यांची माहिती घेतायेत. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत मुंबई आणि राज्यासाठी काही प्रमुख मागण्या करण्यात आल्यात आहेत. यात खालील मागण्यांचा समावेश आहे.

 

 . चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड रेल्वेमार्ग उभारणे

. नेरुळ ते उरण रेल्वेमार्ग पूर्ण करणे

. मुंबईत रेल्वे मार्गांवर असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास करणे

. राज्यभरात ९९ रेल्वे ओव्हरब्रिज बांधणे  

. १७नव्या रेल्वे आणि १६नवीन रेल्वे मार्गांची मागणी करण्यात आलीय.

 

यासोबतच दिल्ली ते मुंबई कॅरिडॉरचा सिंधुदुर्गपर्यंत विस्तार करण्याची मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलीय. तसचं 16 नव्या रेल्वेमार्गांच्या उभारणीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी या मागण्यांचा विचार करणार असल्याचं आश्वासन दिलं असलं तरी एकूणच यंदाचं रेल्वे बजेट ममतादीदींच्या वेगळं ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.