www.24taas.com, मुंबई
आमिर खानच्या सत्यमेव जयतेने भारतीय समाज मनावर दूरगामी परिणाम केला आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव आता दिसायला सुरू झाला आहे. आमिर खानच्या सत्यमेव जयतेने व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या मुक्तांगणला खूप मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. या कार्यक्रमामुळे मुक्तांगणकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
आमिर खानने मुक्तांगणच्या संस्थापक अध्यक्ष मुक्ता पुंताबेकर आणि त्याच्या पतीची ६ जुलैला घेतलेल्या मुलाखतीनंतर सत्यमेव जयते आणि रिलायन्स फाउंडेशनकडून ४ लाख ३७ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. मुक्ता या पैशांचा वापर व्यसनाधिन मुलांच्या सुधारासाठी करणार आहे.
व्यसनाधिन झालेली मुले सहज मिळणारे व्हाइटनरचा वापर करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणी नसतं, त्याचे हे व्यसन सोडवायचा आम्ही प्रयत्न करतो, असे मुक्ता यांनी सांगितले.
या मुलांना आम्ही मोफत उपचार देणार आहोत, हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर या केंद्राकडे सुमारे ५ हजार लोकांनी व्यसनमुक्तीची माहिती घेतली. टेलिफोन किंवा इमेलद्वारे ही माहिती मागण्यात आल्याचे मुक्ता यांनी सांगितले.