सीएसटीतील बेवारस कपाटे हलवली

सीएसटी रेल्वे स्टेशनवर उघड्यावर टाकण्यात आलेली कपाटं उचलण्याचं काम अखेर पोलिसांनी हाती घेतलंय. सीएसटी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर जवळपास १०० कपाटं उडल्यावर पडली होती. दहशतवादी या रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट घडवून आणू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती.

Updated: Nov 30, 2011, 11:37 AM IST

झी २४ तासच्या बातमीचा इम्पॅक्ट

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची..... सीएसटी रेल्वे स्टेशनवर उघड्यावर टाकण्यात आलेली कपाटं उचलण्याचं काम अखेर पोलिसांनी हाती घेतलंय. सीएसटी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर जवळपास १०० कपाटं उडल्यावर पडली होती. दहशतवादी या रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट घडवून आणू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. यासंबंधात रेल्वे प्रशासनाला लिहलेलं पत्रही 'झी 24 तास'च्या हाती लागलं होतं. या कपाटांचा वापर स्फोटकं ठेवण्यासाठी करणं सहज शक्य होतं. त्यामुळे सीएसटी स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली होती. झी 24 तासनं सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवली होती. या बातमीची तातडीनं दखल घेत आता ही कपाटं हटवण्याचं काम सुरु करण्यात आलंय.

मुंबईच्या सीएसटी स्थानकाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे...दहशतवादी करू शकतात बॉम्बस्फोट...ही शक्यता व्यक्त केली आहे रेल्वे पोलीसांनी..कारण, गेल्या सहा महिन्यांपासून सीएसटी स्थानकावर मोटरमॅनचे खराब झालेले 100 कपाट उघड्यावर प्लॅटफोर्म क्रमांक 7 वर पडलेले आहेत...रेल्वे पोलीसांनी रेल्वे प्रशासनाला लिहलेला पत्र झी चोवीस तासचा हाती लागल आहे  ही बातमी काल प्रसारित करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आता जाग आली आहे.