मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अलीकडेच तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षितेची काऴजी न घेतल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.
दहशतवादी करू शकतात बॉम्बस्फोट, ही शक्यता व्यक्त केली आहे रेल्वे पोलीसांनी. कारण, गेल्या सहा महिन्यांपासून सीएसटी स्थानकावर मोटरमॅनचे खराब झालेले 100 कपाट उघड्यावर प्लॅटफोर्म क्रमांक 7 वर पडलेले आहेत.
रेल्वे पोलीसांनी रेल्वे प्रशासनाला लिहलेला पत्र झी चोवीस तासचा हाती लागलयं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अलीकडेच तीन वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याच्या संदर्भात नेमलेल्या राम प्रधान समितीच्या अहवालाची कितपत पूर्तता झाली याचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक बोलाविली होती. या वेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) उमेशचंद्र सरंगी व पोलीस महासंचालक सुब्रमण्यम हे बैठकीला उपस्थित होते. सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याकरिता प्रधान समितीने २६ महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. परंतु त्याकडॆ दुर्लक्ष करण्यात आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.