www.24taas.com, मुंबई
सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. ते सध्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. सुबोधकुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडून कुंटे सुत्रे घेतील.
मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार आज निवृत्त होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच, त्यांनी सुबोधकुमार यांच्या नावाचा आग्रह धरत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती.
त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये अनेकदा वाद रंगले. दरम्यान, सुबोधकुमार यांच्या निवृत्तीनंतर आता नवे आय़ुक्त म्हणून सीताराम कुंटे हे हे महापालिकाचा कारभार पाहणार आहेत, आयुक्तपदासाठी प्रामुख्याने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा होती.
यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ए. के. जैन तर नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांचंही नाव चर्चेत होते. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी यांनाही आयुक्तपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सीताराम कुंटे ह्यांनी महापालिका आयुक्तपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.