‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.

Updated: Jun 23, 2012, 08:15 AM IST

 www.24taas.com, मुंबई  

 

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.  मंत्रालयाच्या संबंधित यंत्रणेला २००७ पासून मंत्रालयाचं ऑडिट करुन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचंही जोशी यांनी स्पष्ट केलंय.

 

 

मंत्रालयात नेमकी आग का भडकली याबाबतची काही कारणं समोर आली आहेत...

- २००७ पासून मंत्रालयाचं फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट नाही.

- अग्निशमनदलाकडे मंत्रालयाचा नकाशा उपलब्ध नव्हता.

- मंत्र्यांच्या दालनाच्या नुतनीकरणात प्लायवूडचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

- बहुतांश मजल्यावर जुन्या फाईल्स आणि फर्निचरचा ढिगारा पडलेला होता.

- मोठ्या जागेत कॅन्टीन्स् थाटली गेली होती.

 

या घटनेच्या चौकशी सत्रातून यथावकाश सत्य बाहेर येईलच मात्र, यापुढे तरी केवळ मंत्रालयच नव्हे तर राज्यातल्या सगळ्याच अतिमहत्त्वाच्या सरकारी कार्यालयांनी जागं होण्याची गरज आहे.

 

.