www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐतिहासिक विक्रांत युद्धनौकेचा लिलाव येत्या १६ जानेवारीपर्यंत तरी लांबणीवर पडला आहे. विक्रांत युद्धनौकेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं येत्या १६ जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
विक्रांत युद्धनौका भंगारात काढू नये, अशी मागणी करणारी याचिका किरण पैगांवकर यांनी केली आहे, त्याबाबतच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिले. विक्रांतबद्दल नौदलाची भूमिका सकारात्मक आहे. राज्य आणि केंद्र सरकारचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, विक्रांतबद्दल दोन्ही सरकारे लक्ष का देत नाहीत, याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.