मुंबईत घरगुती गॅसच्या स्फोटात एकाचा मृत्यू, 10 जखमी

चेंबुरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील साईं दीप वसाहतीत सकाळी 7 च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात 14 जखमी तर उमेश सकपाल या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Updated: Aug 25, 2014, 01:58 PM IST
मुंबईत घरगुती गॅसच्या स्फोटात एकाचा मृत्यू, 10 जखमी title=

मुंबई: चेंबुरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील साईं दीप वसाहतीत सकाळी 7 च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात 14 जखमी तर उमेश सकपाल या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

चाळीतील दुमजली घर असल्यानं स्फोट झाल्यानं मजला कोसळला. त्यामुळं 14 जण जखमी झाले असून यात 9 महिला अणि 4 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये 72वर्षीय महिला ही 70 टक्के भाज्ल्यानं तिची प्रकृति गंभीर आहे. 

स्फोट होण्याआधी आजूबाजुला गॅसचा वास येत असल्याची तकरार रहिवासी करीत होते. मात्र, दुर्लक्ष केल्यानं हा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.