www.24taas.com, नवी दिल्ली
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.
अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सीबीआयने दाखल केलेल्या विविध याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुरू होती. याच प्रकरणी १९९३ मध्ये संजय दत्तने १८ महिने तुरुंगवासही भोगला आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तच्या निर्दोष मुक्ततेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ‘टाडा` न्यायालयाचा संजय दत्तला दोषी ठरविण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी सीबीआयने केली होती.
१९९३ मुंबई स्फोटाचा निकाल आणि घटनाक्रम
>संजय दत्तला साडेतीन वर्षे काढावी लागणार तुरुंगात.
>संजय दत्तला पाच वर्षांचा तुरुंगवास.
>संजय दत्तन याआधीच १८ महिने तुरुंगवास भोगलाय
>याकूब मेमन आणि इतर फरार आरोपी हे `तिरंदाज` - सर्वोच्च न्यायालय
>इतर गुन्हेगार त्यांचे `बाण` - सर्वोच्च न्यायालय
>संजय दत्त मानसिकदृष्ट्या सक्षम - संजय दत्तचे वकील
>गुन्ह्याचे स्वरूप आणि ती परिस्थिती खूपच गंभीर सर्वोच्च न्यायालय
>संजय दत्तला `प्रोबेशन`वर सोडता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
>टाडा न्यायालयाने सुनावलेल्या १८ जणांच्या जन्मठेपेपैकी १६ जणांची शिक्षा कायम
>बॉम्बस्फोटांचा प्रमुख याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम
>मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या दहा जणांना आता जन्मठेप
>१९९३च्या बॉम्बस्फोटांमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचा हात
>या स्फोटांसाठी पोलीस, तटरक्षक दल आणि कस्टम अधिकाऱ्यांचा हात
>दाऊद इब्राहिम आणि इतरांचा या स्फोटात हात
>या स्फोटांचा नियोजन आणि कट पाकिस्तानमध्ये
>स्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाले
>मार्च १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट
>१९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून बॉम्बस्फोट