भक्तांना त्रास देणाऱ्यांना 'फिल्मी स्टाईल' अटक!

देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2013, 11:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं. पण, या प्रकरणात कारवाई करताना २५ जणांना पोलिसांनी अटक केलीय.
आपल्या कामाच्या धावपळीत अनेक भाविक प्रत्येक सोमवारी मध्यरात्री मुंबईत प्रभादेवीला दाखल होऊन परतीच्या प्रवासात पहाटेची पहिली किंवा दुसरी लोकल पकडताना दिसतात. मात्र, कमी रहदारीच्या वेळी या प्रवाशांना टोळक्यांकडून अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. या टोळक्याच्या धावत्या लोकलमध्ये स्टंट करणं, लोकलमधील सहप्रवाशांना तसेच फलाटांवरील प्रवाशांना नाहक त्रास देण, मारहाण करणं अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. महिला प्रवाशांच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस असलेल्या गार्डना आणि मोटरमनला मारहाण केल्यानं हे टोळकं अधिक चर्चेत आलं होतं.

याची दखल घेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास चर्चगेटहून सुटणाऱ्या पहिल्या आणि दुसर्याह ट्रेनच्या प्रत्येक डब्यात साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले होते... त्यामुळे हे २५ जण अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. हुल्लडबाजी करताना पश्चिम रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केलीय. यातील ११ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय तर एकाला एक महिन्याची कैद सुनावण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.