कोकाकोलाचा ५०० कोटींचा नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमेरिका दौरा चांगलाच यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोकाकोला या जगविख्यात सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं आपला नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत उभा करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jun 30, 2015, 02:07 PM IST
कोकाकोलाचा ५०० कोटींचा नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमेरिका दौरा चांगलाच यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोकाकोला या जगविख्यात सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं आपला नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत उभा करण्याचा निर्णय घेतलाय. 

त्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. याबाबत त्यांनीच ही माहिती दिली. सध्या आठवड्याभराच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 

मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यसचिव स्वाधीन क्षेत्र आणि महत्वाच्या सचिवांचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचं इन्वेहस्टमेंट डेस्टिशन व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकाकोलाशी हा करार करण्यात आलाय. 

याशिवाय राज्याचं नवं आयटी धोरण लवकरच अस्तित्वात येतंय. त्यावर आधारित राज्यात साडे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी समजोता करार करण्यात आले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.