आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

Updated: Aug 8, 2015, 07:59 AM IST
आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार,  २५ ऑक्टोबरला परीक्षा title=

मुंबई : आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

आरोग्य खात्याने यासाठी भरती कार्यक्रम आयोजित केला असून २५ ऑक्टोबर लेखी परीक्षा, ५ नोव्हेंबरला निकाल आणि १७ ते २० नोव्हेंबरला पात्र उमेदवारांच्या समुपदेशानाने नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे सावंत म्हणालेत.

आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना त्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्या दूर करुन सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य संचालकांना या पदांच्या भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून २५ ऑक्टोबर २०१५ रोजी या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

गट क मधील एकूण ५२६७ तर गट ड मधील एकूण ३१६९ अशी एकूण ८४३६ पदे रिक्त आहेत.
ही पदे भरण्यासाठी गट क संबंधित परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक हे नियुक्ती प्राधिकारी असून गट ड संवर्गासाठी जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती प्राधिकारी आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.