मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने मुंबई जिल्हा सरकारी बॅंकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने मुंबई जिल्हा सरकारी बॅंकेसह सहकारी बँकांना केवायसी पूर्ण करण्याचे आणि मनी लॉर्डींग रोखण्यासाठी पावले उचलण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला मुंबई बँकेने उत्तरही दिले. मात्र बँकेच्या उत्तराने रिझर्व्ह बँकेचे समाधान झालेले नाही.
मुंबई जिल्हा सरकारी बॅंकेने केवायसीबाबतच्या नियमांची पूर्तता केलेली नाही. तसेच मनी लॉर्डींग रोखण्यासाठीही मुंबई बँकेने पावले उचलली नाहीत, असे निदर्शनास आल्याचे रिझर्व्ह बँकेने मुंबई बँकेला एकलाख रुपयांचा दंड ठोठावताना नमूद केले आहे.