बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.

Updated: Nov 6, 2015, 04:02 PM IST
बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक title=

मुंबई : मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.

मुलुंडच्या अपना बाझार परिसरात ही घटना घडलीय. सकाळी रस्त्यावर झाडू मारत असताना एका सफाई कामगार महिलेला हे एक महिन्यांची मुलगी एका पार्क केलेल्या बसच्या चाकाजवळ कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलं. या बाळाच्या अवती-भोवती अनेक कुत्र्यांचा वावरही होता... परंतु, त्याला कुत्र्यांकडून काहीही इजा झालेली नाही.

शोभा सरोदे या सफाई कामगार महिलेनं तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी जाऊन हे बाळ आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी या बाळाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर या बाळाची तब्येत स्थिर असल्याचं लक्षात आलं. 

त्यानंतर दिवसभर हे बाळ पोलिसांच्याच ताब्यात होतं त्यानंतर त्याला कांजूरमधल्या वात्सल्य ट्रस्टजवळ सोपवण्यात आलंय. तपास सुरू असेपर्यंत या बाळाची जबाबदारी वात्सल्य ट्रस्ट घेणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.