मुंबई : महाराष्ट्र सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी काढलेली, आपले सरकार ही वेबसाईट ही सपशेल फोल ठरलीय. उलट यात जनता वेठीस धरली जातेय आणि अधिकारी मात्र सही सलामत आहेत, त्यांना या पोर्टलकडून आलेल्या तक्रारीविषयी विचारण्याची सोयच नसावी असा अंदाज येतोय.
ऑनलाईन एका तक्रारीच्या निवारणासाठी दीड ते दोन महिने घेतले जातात, त्यावर ही लोकांनी मंत्रालयाच्या पातळीवरून जी कारवाई होणे आवश्यक वाटते, ती ते स्थानिक पातळीवर संपर्क साधावा असं उत्तर देऊन तुमची तक्रार गुंडाळतात. मात्र स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची तसदी आपले सरकार हे पोर्टल घेत नाही.
आपले सरकार या वेबसाईटवर आलेल्या उत्तरावर तुम्ही समाधानी नसाल तर, शेवटी समाधानी आणि असमाधानी असे दोनच पर्याय दिले आहेत, म्हणजे तुमच्या तक्रारीची बोळवणं ही तुमच्याकडूनच समाधानी आणि असमाधानी उत्तर मागवून केली जाते.
स्थानिक पातळीवरून हे प्रश्न जेव्हा सोडवले जात नसतात, तेव्हाच नागरिक मंत्रालयाकडे धाव घेतात, यात पुन्हा स्थानिक पातळीवर संपर्क साधण्याचे आवाहन केल्याने ही वेबसाईट फेल ठरली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
स्थानिक पातळीवरील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना संपर्क साधण्याचा सल्ला या साईटद्वारे दिला जातो, ही अत्यंत त्रासदायक बाब कॉमन मॅनसाठी आहे. तेव्हा एकदा या पोर्टलमधील तक्रारींचा आवाज स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा, सरकारचं चुकत असेल तर सुधारणा करा, आणि मॅनेज करता येत नसेल तर सुखरूप बंद करावी पण जनतेला वेठीस धरू नये अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.