सलमान खानच्या अडचणीत वाढ

हिट अॅंड रन प्रकरणी  अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 9, 2015, 04:11 PM IST
सलमान खानच्या अडचणीत वाढ title=

मुंबई : हिट अॅंड रन प्रकरणी  अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अपघातावेळी सलमानचे बॉडीगार्ड असलेले दिवंगत रवींद्र पाटील यांची साक्ष पुरावा म्हणून वापरण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी सरकारी पक्षाला परवानगी दिली असून हा सलमनला मोठा धक्का आहे. 

साक्ष ग्राह्य धरावी की नाही या बाबत दोन्ही पक्ष आपल्या बाजू मांडणार असून याबाबत अंतिम निर्णय न्यायालय देणार आहे. अपघातावेळी रवींद्र पाटील गाडीत उपस्थित होते त्यामुळे त्यांची साक्ष महत्वपूर्ण आहे. 

सलमान गाडी मद्यपान करून वेगात चालवत होता असे पाटील यांनी आपल्या साक्षीत स्पष्ट सांगितले आहे.  2007 मध्ये पाटीलच यांचे निधन झाले. 
पाटील यांची साक्ष सरकारी पक्षाला पुरावा म्हणून वापरता यावी, यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अर्ज न्यायालयात केला.गुन्हा सिद्ध झाल्यास सलमानला 10  वर्षांची शिक्षा होऊ शकते.