मध्य रेल्वेवर अपघात, लांब पल्ल्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे वळवली

मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी येथे झालेल्या लोकल अपघातानंतर लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे कर्जतकडे वळवण्यात आल्या आहेत.

Updated: Dec 29, 2016, 08:36 AM IST
मध्य रेल्वेवर अपघात, लांब पल्ल्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे वळवली title=

मुंबई : मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी येथे झालेल्या लोकल अपघातानंतर लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे कर्जतकडे वळवण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी दरम्यान कुर्ला - अंबरनाथ लोकलचे पाच डबे घसरल्यानं अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या हजारो प्रवाशांचे दिवसभर हाल होणार आहेत. 

सकाळपासून अंबरनाथ बदलापूरकडून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी स्टेशनवर बघा काहीवेळातच डबे हटवण्यासाठी मध्य रेल्वेची  इंजिनिअरिंग व्हॅन घटनास्थळी पोहचेल असं रेल्वेच्या जनसंपर्क  अधिकाऱ्यांनी झी 24 शी बोलताना म्हटले आहे.

लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे कर्जतकडे वळवण्यात आल्याच्या घोषणा मध्य रेल्वेच्या स्टेशनवर करण्यात येत आहेत. पण लोकलची वाहतूक कधी सुरळीत होणार याबद्दल मात्र अजूनही स्षष्ट झालेले नाही.