बेशिस्त वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं

राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.

Updated: May 9, 2014, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.
बेशिस्त वाहतुकीला लगाम लावणे आणि वाहन चालकांमध्ये जनजागृती हे काम परिवहन विभागाकडून तसेच अन्य विभागांकडून प्रभावीपणे होतांना दिसत नाहीय.
अपघातांचा झोन
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई-गोवा हायवे, मुंबई-नाशिक-धुळे हायवे या रस्त्यांवर प्रामुख्याने अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.
जड वाहनांची मनमानी
जड वाहनंही भरधाव आणि वेगवान लेनमध्ये चालवली जात असल्याने जास्त अपघात होत असल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतंय.
ओव्हर टेक दोन्ही बाजूंनी
ओव्हर टेक डाव्या आणि उजव्या दोनही बाजूंनी होतांन दिसतेय. जागा मिळेल त्या बाजूने पुढे जाऊया असा सपाटा सर्वच वाहन चालकांनी लावली आहे.
लेनच्या शिस्तीविषयी जनजागृती कोण करणार
लेनची शिस्त काय असते, त्या बद्दल वाहन चालकांपर्यंत जनजागृती होत नाही, परराज्यातून येणारे बहुतेक जडं वाहन हवी तशी चालवली जातात. लोखंडी सळयांनी भरलेले ट्रक रस्त्याच्या मधोमध चालवले जातात, यावर कोणताही रिफ्लेक्टर लावलेला नसतो.
अशा अपघातांचं प्रमाण अधिक
गँस ने भरलेले टँकर फास्ट लेनमधून ओव्हर टेक करतांना दिसतात, जड मशीनरी व्यवस्थित न बांधता ट्रेलरवरून नेले जातात.
अनेकदा ट्रकमध्ये भरलेल्या लोखंडी सळई न दिसल्याने कार त्यावर जाऊन धडकते, बिघाड झालेल्या वाहनांवरही कार धडकतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कितीतरी टँकर उलटण्याच्या घटना होतात.
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाला याचं कोणतंही सोयरं सुतक दिसत नाही. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहन चालकांमध्ये लेनच्या शिस्तीविषयी जनजागृती सर्वात महत्वाची आहे. तसेच जड वाहनांवर कारवाई होतांना दिसत नाहीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.