रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये शाहरूखला अटक

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. गुजरातच्या एका मुस्लिम वस्तीची कहाणी रईस चित्रपटात रंगवण्यात आली आहे. 

Updated: Mar 1, 2016, 04:50 PM IST
रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये शाहरूखला अटक title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरूख त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. गुजरातच्या एका मुस्लिम वस्तीची कहाणी रईस चित्रपटात रंगवण्यात आली आहे. 

या सिनेमात मुस्लिम वस्तीचा माणूस अचानक पॉवर फुल बनतो, या चित्रपटात शाहरूखसोबत माहिराचीही मुख्य भूमिका आहे. माहिरा या चित्रपटात शाहरूखच्या बायकोची भूमिका पार पाडणार आहे.

शाहरूखने चित्रपटात दारू विकणाऱ्या माफियाची भूमिका पार पाडली आहे. चित्रपटाची शुटिंग मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर सुरू आहे. मात्र शुटिंग पाहणारे लोक तेव्हा अचानक हैपाण झाले, जेव्हा शाहरूखला अचानक गुजरात पोलिसांनी अटक केली आणि आपल्या व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले.

शाहरूखला गुजरात पोलिसांनी अटक करण्याच्या दृश्याचं हे शुटिंग होतं, या चित्रपटातील हे सर्वात महत्वाचं दृश्य होतं, ज्यात गुजरात पोलीस शाहरूखला अटक करतात.