अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला म्‍हाडाची लॉटरी लागली आहे. मात्र, तिने याआधी सात वेळा अर्ज केला होता. मात्र, ती निराश न होता आठव्यांदा अर्ज केला.  

Updated: Aug 10, 2016, 09:23 PM IST
अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज title=

मुंबई : मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला म्‍हाडाची लॉटरी लागली आहे. मात्र, तिने याआधी सात वेळा अर्ज केला होता. मात्र, ती निराश न होता आठव्यांदा अर्ज केला. त्यात ती यशस्वी झाली. तिचे मुंबईत स्वत:च्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. 

म्‍हाडाच्‍या लॉटरीची आज सोडत निघाली. यामध्‍ये हेमांगी कवीला लॉटरी लागली. हेमांगी कवीसोबत कॉमेडी शोमधून अभिनय करणार्‍या अभिनेत्री सुहास परांजपे यांनी म्‍हाडाचे घर लागले आहे. तसेच सैराट फ्रेम अभिनेत्री छाया कदम यांना सायनच्‍या प्रतीक्षानगरात घर लागले आहे.    
 

कमलेश चौहान, वर्षा माने आणि नीलेश समरदांडे हे तिघेजण पहिल्‍या ड्रॉचे विजेते ठरले असून गोरगाव-सिध्‍दार्थ नगरमध्‍ये त्‍यांना घर मिळणार आहेत तर स्‍वातंत्र्यसैनिक कुटुंबीय प्रवर्गात औरंगाबादचे विजय सीताराम पंतखारकर यांना पवईत घर मिळाले आहे. 

मध्‍यमवर्गीयांसाठी एकूण ९७२ घरांची सोडत आज काढण्‍यात आली.  १ लाख ३६ हजार ५७७ जणांनी या घरांसाठी अर्ज केले होते.