युती ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच मांडणार भूमिका

वीकेण्ड असला तरी राजकीय गरमागरमी वाढायला लागली. काल भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेची यादी जाहीर झाली आहे. तर आजचा शनिवारही राजकीय घडामोडींनी भरगच्च असणार आहे. युतीच्या ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच भूमिका मांडणार आहे.

Updated: Sep 27, 2014, 11:58 AM IST
युती ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच मांडणार भूमिका  title=

मुंबई : वीकेण्ड असला तरी राजकीय गरमागरमी वाढायला लागली. काल भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेची यादी जाहीर झाली आहे. तर आजचा शनिवारही राजकीय घडामोडींनी भरगच्च असणार आहे. युतीच्या ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच भूमिका मांडणार आहे.

शिवसेना आज रेसकोर्सवर प्रचाराचा नारळही फोडणार आहे. उद्धव ठाकरे यांची तोफ आज सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानावर धडाडणार आहे. भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर  उद्धव प्रथमच आठवडाभरातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत. महालक्ष्मीच्या साक्षीने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज मुंबई दौ-यावर येणार आहेत. निवडणुकीच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. रामदास आठवले अजूनही कन्फ्युजन आहे. शिवसेनेबरोबर जायचं की भाजपबरोबर याबद्दल त्यांचं अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. तर आजच उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्याचबरोबर आयाराम-गयारामचा सिलसिला आज आणखी जोरात सुरू राहणार आहे. 

काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर झालीये. 143 उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसनं जाहीर केली असून या यादीतही नितेश राणेंचं नाव नाहीये. तसंच वरो-यातून संजय देवतळेंचाही पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या ऐवजी आसावरी देवतळेंना उमेदवारी देण्यात आलीय. तसेच बडने-याहून सुलभा खोडकेंना उमेदवारी देण्यात आलीये

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज मुंबईच्या दौ-यावर येणार आहेत. ते निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. भाजपच्या दादारमधल्या कार्यालयात आज दिवसभर बैठका सुरू राहणार आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.