'च्यायला, हे आपल्या बापाला कधीच जमले नाही'

आबांना प्रसिद्धीची नॅक बरोबर माहिती आहे. विधिमंडळात संध्याकाळचे सात वाजले की आबा भाषण करीत नाहीत. त्यांना माहिती असते, आता आपली बातमी लागणार नाही.

Updated: Sep 12, 2012, 01:08 PM IST

www.24taaas.com, मुंबई
आबांना प्रसिद्धीची नॅक बरोबर माहिती आहे. विधिमंडळात संध्याकाळचे सात वाजले की आबा भाषण करीत नाहीत. त्यांना माहिती असते, आता आपली बातमी लागणार नाही. पेपरची डेडलाइन निघून गेली आहे. पक्षात किंवा अन्य कार्यक्रमात असले तरी आबा बरोबर टायमिंग साधतात... च्यायला, आपल्या बापाला हे कधीच जमले नाही. अजित पवारांच्या या विधानावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
राज्याचे गृहमंत्रीपद आपल्याकडे यावे असे मलाही वाटते, पण पवार साहेब देत नाहीत अशी सल व्यक्त करतानाच ‘मला एकदा गृहखाते देऊन बघाच’ अशी आर्जवं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
आर. आर. पाटील यांच्यावरील पुस्तक, पण आर. आर.च प्रकाशन सोहळ्याला अनुपस्थित होते. मात्र कार्यक्रमाला हजर नेते आर. आर. यांनाच चिमटे घेत होते. अजित पवारांनी गृहमंत्री होण्याची मनातली इच्छा बोलून दाखविली. तेव्हा भुजबळ म्हणाले, आता तुम्हालाच गृहमंत्रीपद देणार आहोत. मग अजित पवारांनीही ‘देऊन बघाच’ असे सांगत हजरजबाबीपणा दाखवला.