मुंबई : काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे कुटुंबियावर खळबळ जनक आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबियांची भागीदारीमध्ये जमीन खरेदी केली असल्याचा आरोप केलाय.
रायगड जिल्ह्यात वायकरयांच्या पत्नी मनिषा वायकर आणि शिनसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मिळून ९०० कोटींची जमीन खरेदी केल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.
यापूर्वी निरुपम यांनी शिवसेना गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर सरकारी जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असताना निरुपम यांनी आता वायकरांच्या पत्नीसोबत ठाकरे कुटुंबियांचे नाव जोडल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
रायगड जिल्ह्यातील कोलई गावात वायकर यांच्या पत्नीच्या नावे सोडेचार एकर जमीन आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे साडेसहा लाख स्केवअर फूट जमीन खरेदी करण्यात आल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. या जमिनीसाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे.