close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

 युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

Updated: Oct 31, 2016, 03:44 PM IST
पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

पेंग्विनचा मृत्यू दुर्दैवी होता असं सांगत काहींची समज केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टीपुरतीच असते असा घणाघाती टोला शेलारांनी नाव न घेता युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंना लगावलाय. एवढंच नव्हे तर मुंबई विकासाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जात असंही सांगायला शेलार विसरले नाहीत. त्यामुळं आता शिवसेना यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे,