आशिष शेलारांनी घेतील शरद पवारांची गुप्त भेट...

 राज्यांत धुळवड साजरी होत असतानाच वेगवेगळे राजकीय रंगही दिसायला लागलेत.  

Updated: Mar 13, 2017, 09:26 PM IST
आशिष शेलारांनी घेतील शरद पवारांची गुप्त भेट...  title=

मुंबई :  राज्यांत धुळवड साजरी होत असतानाच वेगवेगळे राजकीय रंगही दिसायला लागलेत.  

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारणपणे अर्धा तास चर्चा झाली. 

ही भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भात होती, असा दावा आशिष शेलार यांनी केला. पण राजकीय धामधूमीत शेलार आणि पवार ही भेट नेमकी कशासाठी याचीच चर्चा रंगली होती....