'तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं'- आशिष शेलार

शिवसेनेला दिल्लीतला पराभव हा नरेंद्र मोदींचा पराभव वाटत असेल तर त्यांनी सत्तेतून, युतीतून बाहेर पडावं, आणि आगामी निवडणुकीतही शिवसेनेची स्थिती हे गर्वाचं घर खाली अशीच होईल, अशी भीती आपल्याला असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 10, 2015, 03:37 PM IST
'तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं'- आशिष शेलार title=

मुंबई : शिवसेनेला दिल्लीतला पराभव हा नरेंद्र मोदींचा पराभव वाटत असेल तर त्यांनी सत्तेतून, युतीतून बाहेर पडावं, आणि आगामी निवडणुकीतही शिवसेनेची स्थिती हे गर्वाचं घर खाली अशीच होईल, अशी भीती आपल्याला असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

दिल्लीचा पराभव हा नरेंद्र मोदी यांचा पराभव नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेते देत असतांना, शिवसेनेने थेट नरेंद्र मोदींवर खोचक टीका केल्याने भाजपचे आशिष शेलार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'खुश तो बहुत होंगे तुम' वरून भाजप-शिवसेनेत धुमशान
मुंबई : उद्धव ठाकरे हे मुंबईत पत्रकार परिषदेत येताच, पत्रकारांनी त्यांना पाहून 'खुश तो बहोत होंगे तुम' असं म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांनी हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय असं म्हटलं, 
एवढंच नाहीतर पुढे, "लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, हे निवडणुकीनंतर स्पष्ट झालं आहे," असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला, आणि दिल्लीच्या राजकारणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुमशान सुरू झालं आहे.

दिल्लीतील पराभव हा नरेंद्र मोदी यांचा पराभव, तो किरण बेदींचा पराभव नाही, असं वक्तव्य जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं होतं.

या वक्तव्यावर मुंबईत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, हो हा नरेंद्र मोदींचा पराभव आहे, अण्णांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत, जनतेला गृहीत धरू नका, असं थेट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.