मुंबई: मुंबईत रेल्वेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तेवीस वर्षीय तरुणीचा मोबाईल आणि पर्स चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोराशी झालेल्या झटापटीत अपघात होऊन तनुजा यादव ही तरुणी गंभीर जखमी झालीये.
या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. बोरीवलीहून गोरेगाव इथं जात असताना दोन चोरट्यांनी महिलेचा मोबाईल आणि पर्स खेचून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोबाईल हिसकावण्यासाठी या दोघांनी तनुजावर लाकडाच्या सहाय्यानं हल्ला चढवला. मात्र,तनुजा मोबाईल हातातून सोडत नसल्याचं पाहून हल्लेखोरांनी दगडानं तिच्या डोक्यावर वार केला.
वाढत्या गुन्हयांच्या पार्श्वभूमिवर लोकलच्या महिला डब्यात कायमस्वरुपी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. मात्र,यावेळी डब्यात एकही रक्षक नव्हता. दरम्यान, महिलेवर गोरेगावच्या रुग्णालयात उपचार सुरु असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.