मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला

लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2014, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.
भाईंदरमध्ये राहणारी अपूर्वा चक्रवर्ती नावाची ही तरूणी लोकलने चर्चगेटला जात असताना, मीरारोडला एक अज्ञात तरूण डब्यात घुसला. त्याने अपूर्वाला हातोड्याने मारहाण करून तिच्या गळ्यातली चैन, हातातल्या बांगड्या आणि पायातले पैंजण असा ऐवज लुटला व तो पसार झाला.
या हल्ल्यात अपूर्वा जखमी झाली. तिच्यावर भाईंदरच्या जन्मशताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलेत. यापूर्वी २२ मार्च रोजी नालासोपा-यात लोकलमध्ये घुसून एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही. अशा घटनांमुळं लोकलमधून प्रवास करणा-या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.