आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक

भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

Updated: Jan 26, 2016, 03:20 PM IST
आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक title=

मुंबई : भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

बजाज ऑटोने आता आपली नवीन बाईक बाजारात आणली आहे. बजाज व्ही ही बाईक १ फ्रेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. मात्र या बाईकमधीस सर्वात महत्वाची गोष्ट अशी असेल या बाईकमध्ये वापरण्यात आलेला धातू हा आयएनएस विक्रांतचा असेल.

आयएनएस विक्रांतने देशाची ३६ वर्ष सेवा केली. आयएनएस विक्रांत १९९७ साली निवृत्त झाली आणि १९९४ भंगारात काढली.

"बजाजने ठरवलं आहे की इतिहासाच्या या स्मृती अशा विस्मरणात जाऊ नयेत, त्यासाठी आयएनएस विक्रांतचा धातू आम्ही वितळवला, आणि त्याला नवीन चेहरा आम्ही दिला आहे", असं बजाजने आपल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे.

व्हिडीओत नव्या बाईक विषयी माहिती दिली नसली, तरी बजाज व्ही असा लोगो लावण्यात आला आहे, ही बाईक १ फेब्रुवारी रोजी बाजारात येण्याची शक्यता आहे.