www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झालीय. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात हॉटेल आणि बार मालकांनी कोर्टाचं दार ठोठावलंय तर नवी मुंबईत मात्र ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ची पार्टी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी किती वाजेपर्यंत चालावी, यावरून मुंबईतले बार मालक आणि पोलिसांमध्ये खडाजंगी सुरू झालीय. राज्य सरकारनं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी देताना अंतिम निर्णय मुंबई पोलिसांवर सोपवलाय. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस आयुक्तांनी पार्ट्यांची डेडलाईन रात्री दीड निश्चित केलीय.
नुकतचं मुंबईत झालेल्या गँगरेपच्या पार्श्वभूनीवर आणि थर्टीफस्टच्या पार्ट्यामध्ये मुलींची होणारी छेड़छाड़ टाळण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसची वेळ रात्री दीडवाजेपर्यंत मुंबई पोलिसांनी निश्चित केलीय. गेल्या महिनाभपासून पोलिसांच्या वेळेच्या या विषयावर डझनभर बैठका झाल्या पण तरीही थर्टीफस्ट पार्टी सेलिब्रेशनसच्या वेळेचा तिढा अजूनही कायम आहे आणि हे अपयश लपवण्यासाठी पोलीस आता मीडियाशीही बोलायला तयार नाहीत.
पोलिसांची ही भूमिका आडमुठेपणाची असल्याचा आरोप करत बार आणि हॉटेल मालकांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मुंबई पोलीस का सुरक्षा देत नाही , सुरक्षेच्या मुद्द्यावरून पोलीस आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप हॉटेल व रेस्टॉरंट असोशिएशनच्या निरंजन शेट्टींनी दिलाय.
सरकारनं पहाटे पाचपर्यंत दिलेल्या परवानगीनंतर अनेक बार आणि हॉटेल्सनी मोठ्या पार्ट्या प्लान केल्या होत्या. मात्र, अचानक ही मुदत दीडपर्यंत आल्यास ५०० कोटी रुपयांचं नुकसान होईल, असा दावा बारमालक करत आहेत. ठाणे, नवी मुंबईसह अन्य सर्व शहरांमध्ये पहाटे पाचपर्यंत पोलीस सुरक्षा पुरवणार आहेत. मग मुंबई पोलीसच बार मालकांना का वेठीस धरतायत? असा प्रश्न निर्माण होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.