www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांना नवीन वर्षात बेस्ट वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. बेस्ट वीज दरवाढीला एमईआरसीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं एप्रिलपासून बेस्टची वीज 25 टक्के दरानं महाग होणार आहे. बेस्टच्या परिवहन तोट्याचा फटका 10 लाख वीज ग्राहकांकडना बेस्ट वसूल करणार आहे.
मुंबईची जीवन वाहीनी बेस्ट आर्थिक संकटात सापडलीयं.बेस्टचा 1100 कोटीचा तोटा भरून काढण्यासाठी वीज दरवाढीला एमईआरसीनं मंजुरी दिलीय. ही वीज दरवाढ एप्रिलपासून लागू करण्याचा प्रस्ताव बेस्टन एमईआरसीकडे सादर केलायं.बेस्टची ही वीज दरवाढ घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज दरवाढ सहन करावी लागणार आहे.
घरगुती आताचा दर वाढीव दर
0 ते 100 युनिटसाठी 1.55 रूपयात 2.61 रूपये
100 ते 300 युनिटसाठी 3.30 रूपयात 4.84 रूपये
301 ते 500 युनिटसाठी 5.30 रूपयात 6.80 रूपये
500 च्या वर युनिटसाठी 6.80 रूपयात 8.71 रूपये
तर व्यावासासियक वीज दरवाढ पुढील प्रमाणे असणार आहे.
व्यावसायिक आताचा दर वाढीव दर
0-500 युनिटसाठी 5.50 रूपयात 6.98 रूपये
500 च्यावर युनिटसाठी 8.16 रूपयात 10.36 रूपये
बेस्ट वीज दरावढीचे शिवसेना-भाजप युतीन समर्थन केलयं.एमईआरसीच्या निर्णयानुसार MSEB आणि रिलायन्सचे वीजेचे दराशी आता बेस्टचे दर समान पातळीवर येणार असल्य़ाचा खुलासा बेस्ट कमिटी चेअरमनी केलायं.तर कॉग्रेसन या वीज दरवाढीला विरोध करत.या दरवाढीला मुख्यमंत्र्यानी स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.
येत्या एप्रिलपासून बेस्ट वीज महाग दरानं मिळण्याची शक्यता आहे. बेस्टच्या परिवहन तोट्याचा फटका 10 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर दुसरीकडे बेस्टन 1एप्रिलपासून पुन्हा बेस्ट बस तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलायं.त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षात महागाईचा शॉक बसण्याची शक्यता आहे.