मुंबई: सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत असताना त्यांच्या समता परिषदेच्या नेत्यांनी मात्र शिवसेनेची वाट धरलीय. भुजबळांचे निकटवर्तीय आणि विदर्भातले समता परिषदेचे नेते किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
दादरच्या शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात भुजबळांनी राष्ट्रवादी न सोडण्याच्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.
कन्हेरेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत आज प्रवेश केलाय.
ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना त्रास दिला त्यांना सेनेत घेणार नाही. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.