टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज

सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.  

Updated: Jul 14, 2014, 11:47 AM IST
टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज  title=

मुंबई: सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.  

मी सोशल मीडियावर टीका केली. मोदींवर मी टीका केलेली नाही, असं राज ठाकरे म्हणालेत. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात 'चल हट मोदी कही के...'असा एक जोक ऐकवला होता 

रविवारी मनसेकडून मोफत वाय-फाय सेवेचं राज ठाकरेंनी उद्घाटन केलं, तेव्हा ते बोलत होते. मी मोदींवर टीका केली नाही. मी फक्त एवढच बोललो की, सोशल मीडियावरसुद्धा मोदींची खिल्ली उडवली जात आहे. मी फक्त त्यातील एक विनोद सांगितला होता. माझं वक्तव्य हे सोशल मीडियाबाबत होतं, मोदींबाबत नाही. तसंच त्या मेळाव्यातील संपूर्ण भाजणाचं रेकॉर्डींग माझ्याकडे आहे, असं स्पष्टीकरणही राज यांनी दिलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.