मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सिनेअभिनेता आमिर खान सहभागी होणार आहे. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमिर खाननं अहिष्णुतेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं 'अतुल्य भारत' या सरकारी जाहिरातीतून आमीरची उचलबांगली केली होती. त्यामुळं आमिर आणि भाजप सरकारमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. आता आमीर खान भाजप सरकारच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये १४ फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याचं सरकारने ठरवलं होतं. मात्र हायकोर्टानं परवानगी नाकारल्यामुळे राज्य सरकारने आता हा कार्यक्रम कलिनात आयोजित केलाय.
पाहा व्हिडिओ :