जिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला....

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

Updated: Feb 24, 2017, 05:02 PM IST
जिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला.... title=

मुंबई : छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

काय आहे आजच्या जाहिरातीत....

मुंबईत आज विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भाजपने मुंबईकरांना धन्यवाद म्हटले आहे. यात मुंबईकरांचे शतशः धन्यवाद. हमी पारदर्शी कारभाराची विकासाला साथ मिळाली मुंबईकरांची! असा मजकूर आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. 

गुजराथी स्टाईल 

मुंबई मध्ये मराठी अक्षर नवे वळण घेत आहे. समझने वाले समझ गये, ना समझे वो... (ધન્યવાદ) अशी पोस्ट  फेसबूकवर व्हायरल होत आहे.  भाजपने धन्यवाद म्हणताना गुजराती लिपीप्रमाणे अक्षरांचे वळण देण्यात आले आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे... मराठी अक्षरांना डोक्यावर रेघ असते. पण भाजपने नवीन वळण देत हे अक्षर गुजराती स्टाईलमध्ये दिले असल्याची चर्चा होत आहे. 

यापूर्वी होते जाहिरातीत महाराज...

भाजपने महापालिका निवडणुकीत अनेकवेळा राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. त्यात १५ फेब्रुवारीलाा देण्यात आलेल्या जाहिरातीत महाराजांचा फोटो देण्यात आला होता. त्यात छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच!  असा मजकूर छापण्यात आला होता. 

त्यानंतर १९ फेब्रुवारीला भाजपने मुंबई महापालिकेसाठी जाहिरात दिली. त्यात योगायोगाने शिवजयंतीही होती. त्यावेळी महाराज  प्रकर्षाने होते. त्यात प्रखर देशप्रेम, सगळ्यांना समान न्याय, दुराचाऱ्यांना कठोर शासन, जनतेच्या भल्याचा विचार, दूरदृष्टी आणि स्वच्छ चारित्र्य.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या गुणांनी प्रेरित झालेल्या सुराज्याची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नेतृत्त्वाच्या पाठी उभे राहण्याची हीच वेळ आहे लक्षात असू द्या.... 

असे मतदारांना लक्षात आणून दिले होत पण तेच निवडणुकीनंतर महाराजांना विसरल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.