मुंबई : मुंबई बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार याकूब मेमन यांच्याबद्दल पुळका आलेल्या अभिनेता सलमान खान आता अडचणीत येताना दिसतो आहे. सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्था ज्याला मान्य नाही, अशा व्यक्तीला 2002 च्या हिट अँड रन केसमध्ये दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली.
याकूब मेमनला फाशीची शिक्षा ही नैसर्गिक न्यायाने फाशी होत नसून संपूर्ण न्यायीक प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठरवली आहे. त्यामुळे अशा निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे त्याला जामीनावर बाहेर सोडणे योग्य नाही, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी राज्यपालांना दिले.
या नंतर झी २४ तासशी बोलताना शेलार म्हणाले, राज्यपाल महोदयांनी योग्य ती कारवाई करण्याचे सांगितले असून संबंधीत यंत्रणेकडे पत्र पाठविले असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
Submitted a letter 2 Governor Rao ji, 2 request cancellation of bail of convicted Salman khan for supporting convict! pic.twitter.com/t6vLESYoxE
— ashish shelar (@ShelarAshish) July 26, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.