मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
देवेंद्र फडणवीस सरकारनं अल्पमतात असलेलं सरकार बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकून सुरक्षीत केलं. मात्र, ज्यापध्दतीने हे मतदान झालं त्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड नाराजी असल्याचं समोर येतंय. बुधवारी सोशल मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असणाऱ्या चर्चेचा हाच विषय ठरला होता.
मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अकरा वाजता आपल्या फेसबुक पेजवर एक आभाराचा फोटो अपलोड केला आहे. परंतु, त्यावर अभिनंदनाच्या कमेंट्सपेक्षा भाजपच्या कृतीचा निषेध करणाऱ्याच कमेंट्स अधिक प्रमाणात दिसत आहेत.
पाहा, देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरील काही निवडक प्रतिक्रिया...
@Saurabh Karnik : निकालानंतर आपणास बहुमत मिळाले नाही हे पाहून दुखः झाले, परन्तु राष्ट्रवादीच्या लुभरेपणाकडे लक्ष न देता आपण आपल्या नैसर्गिक मित्राबरोबर सत्ता स्थापन करून आपली आश्वासने पूर्ण करालच अशी भाबडी आशा होती. पण आज राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करून आपण माझ्या पाठीत खंजिर खुपसला आहे. माझा विश्वासघात केला केला आहे. म्हणून मी आपल्याला दिलेले माझे मत मला परत करावे ही नम्र विनंती.
- आपल्याकडून मुर्ख बनविला गेलेला एक मतदार
@Bhagwat Nagargoje : तुम्हाला एकदापन आमच्या मुंडे साहेबांना पवारांनी दिलेला त्रास आठवला नाही, का तर फक्त 4 5 मंत्रीपद जास्त मिळतील म्हणून. आमचा घात केला तुम्ही. सत्तेसाठी तुम्ही एवढे आंधळे व्हाल अस वाटल नव्हत.
@Ravikant Nagare : 'फडणवीसांचा' लवकरच केजरीवाल होणार!!! 'हो हे शक्य आहे' फक्त 'पवार साहेबांच्या धोरणांमुळे'.
@Tatyasaheb Bhosale : एकीकडे गुजरात मध्ये मतदान सक्तीचे करायचे... आणि महाराष्ट्रात आमदारांना मतदानच करू द्यायचे नाही... अहो मोदीसाहेब कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...
@महेश मधुकराव कुलकर्णी : या गद्दारीला महाराष्ट्रातील तमाम जनता उत्तर नक्की देणार
@Vikram Mahajan : फड़नवीस उखाना... शिवसेनेन दिला मुक्का... सरकार करण्याचा होता निर्धार पक्का... पण शेवटी पवार च ठरले आमचे पप्पा
@PrEm Lohakare : बीजेपी च्या चड्डीला राष्ट्रवादीचा पट्टा, फसवून साऱ्या जनतेला केली महाराष्ट्राची थट्टा
@Atul Kate : एक झाडावर सरडा आत्महत्या करतो... चिठ्ठी लिहून ठेवतो की... रंग बदलण्यात शरद पवार व बीजेपी माझ्यापुढे गेल्यामुळे वैफल्यग्रस्त मनःस्थितीत मी आत्महत्या करत आहे
@Chinmay Rajendra Girme : 'हे भविष्य माझ्या हाती... मी प्रचंड आशावादी...' अशी जाहिरात शरद पवार साहेबांनी का बनवली होती, हे आता सगळ्यांना कळलं असेल.
@जीवन मुर्गे : आरे कुठे नेउन ठेवणार आता घोटाळे??? सिंचन घोटाळा...? आदर्श...? लवासा...? सहकार घोटाळा...? वीज घोटाळा....? महाराष्ट्र सदन...? गाडीभर पुरावे...? दादांची अटक...?
@Vijay Morale : 10 मंत्री पदासाठी शिवसेनेला दुर केल...धरणात मुतणारेच शेवटी जवळ केले......कुठे गेला तुमचा शाश्वत धर्म...दरबारी राजकारणीच सगळे, लोकभावना तुम्हाला कळल्याच नाहीत....सव्र्हे करून महाराष्ट्राच मत जाणून घ्या मग कळेल तुम्हाला तुमची जागा...
@Abhi Chandole : फडणवीसांच्या पुस्तकाला पवारांचं कव्हर... राष्ट्रवादी निघाली कमळाबाईची लव्हर...
@Abhishek Nkashe : अहो, फडणवीस जी... ह्या तुमचाच पेज वर जनतेच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातून काहीतरी शिका... बघा महाराष्ट्र आज तुमच्या नावाने शिमगा करतोय... अजून तरी शहाणे व्हा आणि राष्ट्रवादी पासून १०० हात लांब राहा... २५ वर्षांची सोबत करून शिवसेनेला दूर सारलात हे खूप चुकीचे केलेत.
पाहा, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर पेजवरील काही निवडक प्रतिक्रिया...
@keshda @Dev_Fadnavis Dear CM, you have not won anything today that you can be proud of. Just bought yourself another six months.
— Vishu (@PakkaMumbaikar) November 12, 2014
\
@SMedia4 corruption cases against NCP without affecting stability of govt n/n @Sootradhar @Dev_Fadnavis @ggiittiikkaa
— Meghna Shah (@MeghnaShah7) November 12, 2014
@MeghnaShah7 No way all investigation into scams Irrigation and Adarsh will go unhindered. @SMedia4 @Dev_Fadnavis @ggiittiikkaa
— सूत्रधार (@Sootradhar) November 12, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.