काय म्हणाले मुंबईत अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज षण्मुखानंद सभागृहात विशाल कार्यकर्ता संमेलनात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

Updated: Sep 4, 2014, 08:06 PM IST
काय म्हणाले मुंबईत अमित शहा title=

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज षण्मुखानंद सभागृहात विशाल कार्यकर्ता संमेलनात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

अमित शहा यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
अमित शहांच्या उपस्थितीत चौघांचा पक्षप्रवेश
*  बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील भाजपमध्ये दाखल
*  राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपमध्ये
*  भास्करराव खतगावकर, माधराव किन्हाळकर भाजपात
*  महाराष्ट्रात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा
*  देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात श्रीगणेशा
*  अमित शहांच्या भाषणाला सुरूवात
*  बाळासाहेब ठाकरेंची भूमी म्हणून अमित शहांनी केला उल्लेख
*  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील भ्रष्टाचाराची मोठी सूची
*  आता वाचायला घेतली तर भागवत सप्ताहाचे सात दिवसही कमी पडतील
*  शेतकऱ्याचा पैसा आमदाराच्या घरी चहा-पाण्यावर खर्च होतो
*  महाराष्ट्रातून काँग्रेसला काढून फेकावी
*  अमित शहांचा राहुल गांधींवरून दिग्विजय सिंहांना टोमणा
*  राहुल गांधी आणखी बोलले असते तर... 44 खासदार पण निवडून आले नसते
*  महाराष्ट्रात पण भाजपनं असा विजय मिळवायला हवा की केंद्राप्रमाणेच इथेही विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसला झगडावं लागायला हवं
*  अमित शहांनी केली मोदींच्या कामाचं गुणगान
*  पियुष गोयलमध्ये पडले नसते तर मुंबई अंधारात असती
*  अमित शहांची शरद पवारांवर टीका...WTO वरून टीका
*  महाराष्ट्राचा विकास झाला तो केवळ युतीच्या सत्तेत
*  100 दिवसांमध्ये मोदी सरकारनं देशाचा विकास दर वाढवला
*  गुजरातमध्ये 12 वर्षात एकदाही दुष्काळ नाही, महाराष्ट्रात 15 वर्षात 7 वर्ष दुष्काळ
*  शिवाजी महाराजांच्या भूमीत पुन्हा सुराज्य हवं असेल तर भाजपलाच सत्ता द्या
*  अमित शहांचे सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील गावागावात जाण्याचे निर्देश
*  मोदींचा संदेश गावागावात पोहोचवा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.