भाजप-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप, करुन दाखलं म्हणारे जेलमध्ये जाणार : भाजप

मुंबईच्या रस्ते घोटाळ्यावरून शिवसेना भाजपवरून आरोप प्रत्यारोप सुरु झालाय. करून दाखवणारेही आता जेलमध्ये जातील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलारांचा यांनी शिवसेनेला लगावलाय. दरम्यान, आम्हीच हे प्रकरण उजेडात आणलं, असा दावा शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलाय.

Updated: Jun 16, 2016, 09:13 PM IST
भाजप-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप, करुन दाखलं म्हणारे जेलमध्ये जाणार : भाजप  title=

मुंबई : मुंबईच्या रस्ते घोटाळ्यावरून शिवसेना भाजपवरून आरोप प्रत्यारोप सुरु झालाय. करून दाखवणारेही आता जेलमध्ये जातील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलारांचा यांनी शिवसेनेला लगावलाय. दरम्यान, आम्हीच हे प्रकरण उजेडात आणलं, असा दावा शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलाय.

मुंबई महापालिकेच्या रस्ता घोटाळा प्रकरणी १० जणांना अटक झाल्यानंतर आता यावरून राजकारण रंगलंय. घोटाळ्याला पाठीशी घालणारे आणि करून दाखवलं असं म्हणणाऱ्यांवर आता आत जायची वेळ येऊ शकते, अस म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावलाय.

तर भाजप नेते बिथरल्यामुळेच असे आरोप करत असल्याचा पलटवार मुंबई महापालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केलाय. तसेच निलम गोऱ्हे यांनी दावा केलाय हे प्रकरण आम्हीच उजेडात आणलंय. तर काँग्रेसनंही या वादात उडी घेत सत्तेत राहून भांडणारे दोन्ही पक्ष या घोटाळ्याला जबाबदार असल्याचं म्हटलंय.