भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Updated: Sep 26, 2014, 11:44 AM IST
भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस title=

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण-पश्चिममधून आपला अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचं साटंलोटं असल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केला आहे.मात्र राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा वेगळी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी म्हटलंय. 

पितृपक्षाचे कावळे उडाले

दरम्यान, महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. पितृपक्षाचे कावळे उडाले. गेली पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या विचारांनी घट्ट बांधली गेलेली शिवसेना-भाजपची युती दुर्दैवाने संपुष्टात आली आहे. शिवसेना-भाजप आणि घटकपक्षांची महायुती अखंड राहावी यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने युती कायम राहू शकली नाही. आता पुढे काय घडेल, काय बिघडेल ते दिसेलच.

सर्व काही सांभाळण्यास आई तुळजाभवानी समर्थ आहे. ती जसे ठरवील तसेच होईल. फक्त या सर्व राजकारणात महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडू नये. महाराष्ट्र कोसळला तर इतिहास माफ करणार नाही. काल जे या तंबूत आरती करीत होते ते क्षणात दुस-या तंबूत जाऊन 'नमाज' पढतात. तेव्हा विचार, निष्ठा या शब्दांना तसे काही मोलच उरलेले नाही हे पटते. 11 कोटी जनतेच्या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत. 105 मराठी हुतात्म्यांच्या बलिदानावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.