युती तुटल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे एकला चलो चा नारा दिल्या नंतर ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलंय.. आता ठाणे महानगर पालिकेत भाजपाची ताकद दिसून येईल असे सांगत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

Updated: Jan 27, 2017, 09:23 AM IST
युती तुटल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष title=

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे एकला चलो चा नारा दिल्या नंतर ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलंय.. आता ठाणे महानगर पालिकेत भाजपाची ताकद दिसून येईल असे सांगत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

ठाण्यातील इंदिरानगर येथे कार्यकर्त्यांनी भाजपच्या नावाने घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला.. ठाणे महानगर पालिकेत होणारी गळचेपी कमी होईल असं यावेळी ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.