मुंबई विकास आराखड्यावरुन भाजपने साधला शिवसेनेवर निशाणा

 मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजपने विधानसभेत शिवसेनेला लक्ष्य केलं. विकास आराखड्याचं काम एका कंपनीला तर कंत्राट दुस-याच कंपनीला दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा बेकायदेशीर असल्याचं ते म्हणालेत.

Updated: Apr 1, 2015, 06:02 PM IST
मुंबई विकास आराखड्यावरुन भाजपने साधला शिवसेनेवर निशाणा  title=

मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजपने विधानसभेत शिवसेनेला लक्ष्य केलं. विकास आराखड्याचं काम एका कंपनीला तर कंत्राट दुस-याच कंपनीला दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा बेकायदेशीर असल्याचं ते म्हणालेत.

अशा बेकायदेशीर विकास आराखड्याला स्थायी समितीने मान्यता कशी दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा विकास आराखडा मुंबईकरांच्या हीताचा नसल्याचं ते म्हणाले. मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केल्याने पुन्हा सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत युती करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले असताना आता टीका होत असल्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत विकास आऱाखड्यावर टीका केली. कंत्राट दिलेल्या कंपनीने विकास आराखड्याचे काम केलेच नाही. विकास आराखड्याचे कंत्राट एका कंपनीला, काम मात्र केले दुसऱ्या कंपनीने, असे ते म्हणालेत. या प्रकरामुळे हा विकास आराखडाच बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्थायी समितीने बेकायदेशीर विकास आराखड्याला मंजुरी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे.

माजी सनदी अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  विकास आऱाखडा हे मुंबई महापालिकेचे पाप, असे म्हणत भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विकास आराखड्यात मुंबईकरांचे हित जपले गेलेले नाही. किचकट इंग्रजी विकास आराखड्याचे मराठीत भाषांतर करावे, विकास आराखड्याबाबत हरकती आणि सूचनांसाठी ६०दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून मुंबईचा सर्व्हे करताना कंपनीने संरक्षण विभागाचीही परवानगी घेतली नाही, असे भाजपकडून टीका करताना स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.