'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखराचा दर्जा

महाराष्ट्राचा पर्यावरणीय ठेवा अशी ओळख असलेल्या पश्चिम घाटाने आता राज्याला अजून एक अनोखी ओळख मिळवून दिलीय.

Updated: Jun 22, 2015, 09:18 PM IST
'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखराचा दर्जा title=

मुंबई : महाराष्ट्राचा पर्यावरणीय ठेवा अशी ओळख असलेल्या पश्चिम घाटाने आता राज्याला अजून एक अनोखी ओळख मिळवून दिलीय.

पश्चिम घाटात आढळणा-या ब्लू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आलाय. ब्लू मॉरमॉन हे गडद निळ्या रंगाचं एक छानसं फुलपाखरू. पंखांवर खालच्या बाजून असलेल्या पांढ-या रंगामुळे आणि त्यावरच्या उठावदार काळ्या ठिपक्यांमुळे हे फुलपाखरू अतिशय गोंडस दिसतं.

राज्यात आढळणा-या या सुंदर फुलपाखराला आता राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलाय. विशेष म्हणजे असा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.